वाट अडवून जबरी चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या. तिघं संशयित पोलिसांच्या ताब्यात.
स्वतःहून कट मारायचा चालकासोबत कृपा करून भांडण करायचं निर्जन्य ठिकाणी नेऊन त्याला लुटायचं असाच प्रकार नाशिकमध्ये घडत होता . अशा प्रकारची लूट झाल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. फिर्यादी हर्षल सुभाष पारोळकर हे त्यांच्या कारमध्ये इंदिरानगर येथील बोगद्या पासून जॉगिंग ट्रॅक कडे जात असताना साईनाथ चौफुलीवर एका रिक्षाचालकाने हर्षल परळकर यांची कार एम एच 15 एफ टी 71 76 या कारला एका रिक्षा चालकाने कट मारला. हर्षल ने कारचा वेग कमी केला असता रिक्षाचालकाने तू आमच्या रिक्षाला कट मारला म्हणून बळजबरीने हर्षल च्या कार मध्ये चार अनोळखी लोक बसले. कट मारल्याच्या कारणावरून शिवीगाळ मारहाण केली जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हर्षल च्या कालच्या पाठीमागे च्या सीटवर बसून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवल. बळजबरीने त्याच्या खिशातील चार हजार रुपये सॅमसंग कंपनीचा मोबाईल घड्याळ आणती असा ऐवज काढून घेतला. हर्षलच्या गुगल पे वरतून बळजबरीने पैसेही ट्रान्सफर केले. ही घटना विलोळी येथील जैन मंदिराच्या ठिकाणी घडली. यासंदर्भात मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये 394,364 अ 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची गांभीरता ओळखून सदरचा युनिट क्र. 1 यांच्याकडे वर्ग करण्यात आला. गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांची टीमnnहेमंत तोडकर, रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, विशाल देवरे, मुक्तार शेख, आप्पा पानवळ यांनी गुन्हा दाखल होताच, तात्काळ समांतर तपास करून सदर आरोपी हे विल्होळी या दिशेकडे गेल्याची माहीती मिळाली होती, सदर परीसरातील सी. सी.टि.व्ही. फुटेज तपासले असता, एका पेट्रोलपंपावर आरोपीचे सी. सी. टी. व्ही. फुटेज मिळुन आले, सदर सी.सी.टी.व्ही फुटेजवरून गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींचा शोध घेत असता मुख्तार शेख यांना आरोपींबाबत माहीती मिळाली, संशयित आरोपी युनुस उर्फ अण्णा अयुब शहा वय २४ वर्षे रा. बिल्डींग नं. अ-७, चवथा गजला म्हाडा कॉलनी, वडाळागांव नाशिक, वसीम बशीर सैय्यद वय ४१ वर्षे रा. घर नं. १५/२, संजेरी मार्ग, वडाळा गांव नाशिक, गुलाम सादीक मोठे वय २७ वर्षे रा. माळी गल्ली, वज्रेश्वरी मंदीराजवळ, वडाळागाव नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून सखोल विचारपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली. संशयित आरोपींनी हर्षल कडुन जबरी चोरी केलेले एक टायटन कंपनीचे घडयाळ, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन, एक पांढ-या धातुची अंगठी व रोख रक्कम ४,५००/- रू तसेच गुन्हयात वापरलेली अॅटो रिक्षा क्रमांक एम.एच १५ झेड ९८४७ असा एकूण ९६,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल पंचनामा करून हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपी पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.