शिगवे बहुला स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन
देवळाली कॅम्प प्रमोद राहणे :- येथील शिगवे बहुला स्मशानभूमीनजीक सुमारे ९.२० कोटी रु. कामाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिपाइं नेते विश्वनाथ काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, माजी सनदी अधिकारी भीमराव धिवरे, माजी नगरसेविका प्रभावती धिवरे,साहेबराव चौधरी, भास्कर चौधरी, प्रमोद मोजाड, गणेश कदम आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.यावेळी खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून गाव ते स्मशानभूमी पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण तर धोंडी रोड ते शिगवे बहुला ५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.