July 13, 2026

रविवारी प.सा. नाट्यगृहात रफींची “तुमसे अच्छा कौन है”…मैफल

0

प्रमोद रहाणे l नाशिक : – लोकप्रिय गायक मोहम्मद रफी यांचा रविवार दि. २४ डिसेंबर रोजी ९९ वां जन्मदिन आहे. त्यानिमित्त सूर शारदा म्युझिकल फाउंडेशनतर्फे गायक घनश्याम पटेल यांनी ‘ तुमसे अच्छा कौन है ‘ या मैफलीचे आयोजन केले आहे. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता ही विनामूल्य मैफल होईल. मोहम्मद रफींनी हजारो सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांना बहाल केला आहे. त्यातील निवडक गाणी प्रमुख गायक घनश्याम पटेल यांच्यासह संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील अमित गुरव सादर करणार आहेत. त्यांना गायिका स्मिता पांडे, मयुरी मुरुडेश्र्वर स्वरसाथ करतील. संगीत संयोजन गायक नंदकुमार देशपांडे यांचे आहे. संगीतसाथ अमोल पाळेकर व सहकारी करतील. पवन वंजारी तांत्रिक बाजू सांभाळणार असून उस्मान पटणी‌nnनिवेदनाद्वारे रफींच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेतील.nnसर्व रसिकांनी उपस्थित राहून सुवर्णमयी काळातील गाण्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. येणारे वर्ष रफी साहेबांचे जन्म शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने घनश्याम पटेल आणि सहकारी यांच्या सुर शारदा ग्रुपने दर महिन्याच्या २४ तारखेला रफी साहेबांना आदरांजली म्हणून संगीत मैफिलींचे आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *