July 14, 2026

नाशिकच्या सीआरपीएफ मधील जवानाचा दिल्लीत मृत्यू.

0

मंगळवारी सकाळी नांदूरला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.nकर्तव्य बजावताना राजधानीत आला हृदय विकाराचा तीव्र झटका.nnआडगाव इच्छामणी नगर येथील रहिवासी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अति शीघ्र कृती प्रतिसाद दलातील हेड कॉन्स्टेबल सचिन श्रीराम चव्हाण वय वर्ष ४०, यांचे रविवार दिनांक ११ रोजी रात्री राजधानी दिल्ली येथे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले होते.nआडगाव कोणार्क नगर येथील इच्छामणी नगर मध्ये राहत असलेले सीआरपीएफ फोर्स मधील हेड कॉन्स्टेबल सचिन श्रीराम चव्हाण यांच्या मृत्यूची खबर मिळताच परिसरात शोककळा पसरली होती. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी नऊ वाजता नांदूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .nसीआरपीएफ फोर्स मधील वरिष्ठ अधिकारी तसेच कुटुंबीयांच्या वतीने सचिन चव्हाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सी आर पी एफ च्या जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी दिली. तसेच उपस्थितांनी पार्थिवास सलामी देवुन श्रद्धांजली अर्पण केली.nअधिकाऱ्यांनी मयत सचिन चव्हाण यांचा मुलगा, पत्नी ,तसेच इतर कुटुंबीय नातेवाईक यांचे सांत्वन केले. स्वर्गीय चव्हाण यांच्या मुलाने अंतिम संस्कार करून पार्थिवास अग्नीडाग दिला. सचिन चव्हाण हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी असून हल्ली ते नाशिकच्या आडगाव शिवारात अंबिका चौकात राहत होते. चव्हाण 2004 साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. चव्हाण यांचे पार्थिव गुजरात येथून मंगळवारी सकाळी नाशिकला आणण्यात आले. त्यांच्यावर सकाळी नऊ वाजता नाशिकच्या नांदूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चव्हाण यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *