July 14, 2026

देवळालीत माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

0

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :-nयेथील गुरुद्वारा रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिर, गवळी वाड्यातील सिध्दीविनायक गणेश मंदिरासह चांदीचा गणपती असलेल्या विजय अमरदीप मंडळाच्या वतीने गणेशयाग अभिषेक, महापूजा, आरती व महाप्रसाद वाटप करण्यात येऊन माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.nइच्छापूर्ती गणेश मंदिराचे विश्वस्त शामराव कदम यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी अनिल परदेशी, गिरीश गायकवाड, दशरथ कासार , कैलास परदेशी, कलमेश खरोटे, पोपट इल्ले, अशोक ग्रोव्हर आदींसह भाविक उपस्थित होते. रात्री भैरवनाथ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.nगवळीवाडा येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणेश जन्म, गणेश याग, आरती, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडले. सकाळी प्रकाश यादव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. गणेश याग प्रसंगी करण मेंद्रे यांनी यजमानपद भूषविले. यावेळी सुरेश कदम, दीपक बुंदेले, कचरू गोडसे, रमेश शिरसाट, बाळकृष्ण नायडू, हेमंत चव्हाण, विनोद गोडसे, दिलीप पगारे आदी उपस्थित होते. विजय अमरदीप मित्र मंडळाच्या वतीने चांदीच्या गणेश मूर्तीची विधिवत पूजा करून दुपारी नीलेश मकवान व पूजा मकवान यांच्या हस्ते गणेशयाग करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक परदेशी, सुनील गाडेकर, डाॅ.शिवराम गोडसे, भरत पाटील, राजेश स्वामी , जितेंद्र दसपूते, दत्तू पाळदे यांसह मंडळाचे सदस्य प्रयत्नशील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *