July 13, 2026

समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञ लोकांना काँग्रेससोबत जोडण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियान.

0

मुंबई, दि. ३१ जानेवारी २०२६.. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नवीन व तज्ञ चेहऱ्यांना संधी देण्यासाठी एक अभियान सुरु केले आहे. काँग्रेस पक्षासाठी काम करु इच्छिणाऱ्या विविध क्षेत्रातील तज्ञांना काँग्रेस पक्ष एक व्यासपीठ मिळवून देणार आहे, त्यासाठी देशभर प्रतिक्षा शोध अभियान सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी आमदार हरि शंकर गुप्ता यांनी दिली आहे.nnराजीव गांधी भवन येथील पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते हरि शंकर गुप्ता पुढे म्हणाले की, हे अभियान तीन टप्प्यात राबविले जाणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत, त्यानंतर या अर्जांची छाननी केली जाईल व काँग्रेसचे वरिष्ठ नेते, ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार, समाजातील तज्ञ लोकांची समिती प्रत्यक्ष मुलाखती घेतील आणि त्यातून अंतिम निवड करण्यात येईल. देशभरात या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रक्रियेतून निवड झालेल्यांना काँग्रेस पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रवक्ते, सोशल मीडियासह विविध संशोधनपर काम करण्याची संधी देणार येणार आहे. काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांनी या अभियात सहभागी व्हावे, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.nnमुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यावेळी म्हणाले की, मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वात टॅलेंट हंट कमिटीची स्थापना करण्यात आली असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, राबवण्यासाठी मुंबईच्या सर्व जिल्ह्यात समन्वय साधण्याचे काम केले जाईल. काँग्रेस संघटना मजबूत करण्याच्या कामाचा एक भाग म्हणून टॅलेंट हंट अभियान सुरु करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियातून यांची निवड होईल त्याचा पक्षाला फायदाच होईल. काँग्रेस पक्षाशी विविध क्षेत्रातील लोक जोडले जातील. असेही राजहंस म्हणाले..nnयावेळी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन, शकील चौधरी, अनुसूचित जाती विभाग मुंबई अध्यक्ष सुभाष भालेराव इत्यादी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *