July 14, 2026

*राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात एप्रिल फुल आंदोलन.nnनाशिक : शहरnnकेंद्र  सरकारच्या वतीने विकासाच्या आणि रोजगाराच्या केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ जनतेला एप्रिल फुल आहे अशी घोषणाबाजी करत आज नाशिक शहर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे व युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृवाखाली आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारच्या विकास आणि रोजगाराच्या घोषणा म्हणजे निव्वळ एप्रिल फुल अशी टीका युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली.nnयावेळी चेतन कासव, बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, डॉ.संदीप चव्हाण, अमोल नाईक, विशाल डोके, राहुल कमानकर, निलेश भंदुरे, विशाल मयेकर, जाणु नवले, सोनु वायकर, रोहित पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, कुलदीप जेजुरकर, सुयश मेने यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. यावेळी मोदी सरकार रोजगार कधी मिळणार अशा आशय असलेला केक कापण्यात आला. सहभागी आंदोलकांनी काळ्या फित बांधून निषेध व्यक्त केला.nnराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज १ एप्रिलचे औचित्य साधत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत १ एप्रिल निमित्त फसव्या विकासाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विकासाच काय झालं ? एप्रिल फुल , रोजगाराच काय झालं ? एप्रिल फुल, दोन कोटी नोकऱ्यांच काय झालं ? एप्रिल फुलच्या घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *