July 14, 2026

 nnपुजाऱ्यांनी नुसती दिलगिरी व्यक्त न करता माफी मागावीnnकरण गायकर : मंदिरातील सर्वांना सद्बुद्धीची केली प्रभू रामरायाकडे मागणीnnनाशिक : शहरnश्री काळाराम मंदिरात छत्रपती राजेंच्या वाढदिवसाच्या दिवशीच छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांचा अपमान केल्याची घटना आहे. संयोगिनीराजेंनी घडलेली गोष्ट मांडली असून ती पूर्ण पणे सत्य व वस्तुनिष्ठ आहे. याचा अनुभव यापूर्वीही अनेक भाविकांना आला आहे. या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करणार होतो. परंतु मंदिरात पूर्व नियोजित उत्सव सुरू असल्याने आंदोलन केले नाही. त्यामुळे पुजारीनी नुसती दिलगिरी व्यक्त न करता माफी मागावी. मंदिरात राहून खोटे न बोलता सर्वांना प्रभू रामराया सद्बुद्धी देवो,अशी प्रार्थना देखील स्वराज्य संघटनेचे संपर्कप्रमुख करण गायकर यांनी पत्रकार परिषदेत प्रभू रामरायाकडे केली आहे.nnशासकीय विश्राम गृह येथे शनिवारी (दि.१ एप्रिल) आयोजित पत्रकार परिषदेत गायकर बोलत होते. ते म्हणाले की हा लढा कोण्या जाती, धर्मा विरोधात नसून प्रवृत्ती विरोधात आहे.nपुजाऱ्यांनी जाणून जाणून शब्द वापरले. जर संयोगिताराजे छत्रपती यांची पोस्ट तुम्ही वाचली नाही म्हणतात तर पत्रकार परीषद कशाच्या आधारे घेतली ? असा सवालही गायकर यांनी संबंधित महताना विचारला आहे. महंत यांना चर्चेत राहण्याची सवय आहे. महंतांना सद्बुद्धी यांवी, त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणूनच संयोगिताराजे छत्रपती यांनी समाजमाध्यमावर मत व्यक्त केले.दक्षिणा ही पुजाऱ्यांना नसून ,मंदिराला दिली आहे. छत्रपती घराणे प्रत्येक ठिकाणच्या मंदिरात दक्षिणा देत असतात. निदान श्रीरामांच्या दरबारात खोटे बोलणे सोडून , पुजाऱ्यानी त्यांचा आदर्श आचरणात आणण्याची खरी गरज असल्याचे गायकर यांनी सांगितले . यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *