July 13, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार जिल्हयातील नुकसान ग्रस्त ठिकाणचा पाहणी दौराnनाशिक : जिल्हाnnसलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्हात मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी व गारपिटीने सटाणा येथे दोन दिवसात साडेचार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पार्श्वभूमीवर नुकसानीची पाहणी करण्यासाठी अयोध्या दौराआटपुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यात नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. आज दुपारी दिड वाजता सटाण्यात नुकसानीची ते पाहाणी करणार आहे.nमुख्यमंत्री यांचा अचानक दौरा आल्याने शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली आहे. सटाणा सह जिल्हा अनेक ठिकाणी गारपिटीने बहुतांश घरांची पडझड झाली आहे. कांदा पावसात भिजल्याने टिकवण क्षमता संपणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अन्य शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा, डाळिंब, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यासर्व परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *