महिलेची आँनलाइन फसवणूक करणार्यास अटक
नाशिक : शहर
कॉस्मेटिक प्रोडक्टस तयार करण्याचा घरगुती व्यवसाय असणाऱ्या नाशिककर महिलेस व्यवसायवृद्धीसाठी पाच लाखांचा ऑनलाइन गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यातील संशयित आरोपीचा सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन त्यास गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथून जेरबंद करण्यात आले आहे. न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींसह इतर बँक खात्यांचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितिश रमेश कुमार (रा. खोडा कॉलनी, गौतमबुद्धनगर, गाझियाबाद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, राज सोमवीर राघव शिवपुरी, न्यू विजयनगर, गाझियाबाद, रुपयांची फसवणूक केली. उत्तर प्रदेश) याचा शोध सुरू आहे.
सविता अविनाश पवार यांचा कॉस्मेटिक प्रोडक्टस तयार करण्याचा घरगुती व्यवसाय आहे. फिर्यादी यांनी फेब्रुवारी २०२२ च्या अखेरीस फेसबुकवरील ‘व्यापार इन्फोइंडिया प्रा. लि.’ असे नाव असलेल्या फेसबुक पेजला लाइक केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून फिर्यादीस वारंवार फोन करणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादीस सांगितले की, आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वृद्धी करून देऊ, तुमचा कस्टमर प्लॅटफॉर्म तयार करून देऊ, त्याकरिता रजिस्ट्रेशन करण्यासाठी २६ हजार इतकी रक्कम भरावी लागेल.
फिर्यादी यांनी प्रथम त्यास नकार दिल्यावर कमीत कमी एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करा, असे सांगितले. फिर्यादी यांनी सदरची रक्कम ऑनलाइन भरल्यानंतरही गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादीस वेबसाइट करण्यासाठी, फिर्यादीच्या प्रोडक्टसची फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, अॅमेझॉन यांसारख्या सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी ऑनलाइन कस्टमर मिळवून देण्यासाठी, कस्टमरकडून पेमेंट प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे पेमेंट गेटवे लिंक तयार करण्यासाठी तसेच तुमचे प्रोडक्टस घेण्यासाठी मोठे खरेदीदार तयार आहे. परंतु त्यासाठी पेमेंट गेटवेचे लिमिट वाढवावे लागेल अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादीस वेळोवळी पैसे (रा. भरण्यास लावून एकूण ५ लाख ,१३, हजार २००/- रुपयांची फसवणूक केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली व सहायक तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. या गुन्ह्यातील संशयित आरोपींनी फिर्यादीची फसवणूक करण्याकामी फिर्यादीस इंडसइंड बँक खाते क्रमांक २५७२९१८००६७८ यावर पैसे पाठविण्यास सांगितले होते. सदर बँक खात्याची माहिती प्राप्त केली असता सदरचे खाते हे ‘व्यापार इन्फोइंडिया प्रा. लि. या कंपनीच्या नावाने करंट खाते असून, या कंपनीचे डायरेक्टर हे नितीश रमेश कुमार व राज सोमवीर राघव असे असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच आरोपींनी वारलेला मोबाइल क्रमांक ७५२९९८३५५२ याची तांत्रिक विश्लेषण शाखा, नाशिक शहर यांच्याकडून माहिती घेतली असता नमूद मोबाइल क्रमांक हा गुन्ह्यातील आरोपी नितीश रमेश आहे. कुमार याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
गाझियाबाद येथे जाऊन शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे, पोलीस हवालदार शहाजी भोर, पोलीस नाईक चंद्रकांत पाटील असे पोलीस पथक १५ मार्चला रवाना केले. १८ मार्चला सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने गुन्ह्यातील नितीश रमेश कुमार यास खोडा कॉलनी, गाझियाबाद येथून शिताफिने अटक केली. त्यास ट्रांझिट रिमांडद्वारे नाशिकमध्ये आणण्यात आले. न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.