Homeराज्यातील बातमीनाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिकातील विकासाचे प्रकल्प पूर्ण झाले आहे. तसेच काही अपूर्ण अवस्थेत आहे. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक विकासाची कामे येण्याची आवश्यकता आहे. मा नाशिकवर नेहमीच अन्याय होत असून नाशिकवर होणारा हा अन्याय शासनाने दूर करावा अशी प्रमुख मागणी करत नाशिकच्या उद्योग, पर्यावरण, पाणी पुरवठा, शहर विकास, वाहतूक यासह अनेक प्रश्नांवर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नियम २९३ अन्वये नाशिकच्या प्रश्नांबाबत मांडलेल्या विधानसभेतील  प्रस्तावावर चर्चा करतांना शुक्रवारी शासनाचे लक्ष वेधले. नाशिकला पौराणिक इतिहास आहे. आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले नाशिक शहर प्रदूषित होत असल्याचे समोर येत आहे. शहरात वायू, पाणी आणि ध्वनी प्रदूषण वाढले असून, त्याचा प्रत्यक्ष परिणाम मानवी आरोग्यावर तसेच नैसर्गिक पर्यावरणावर होत आहे. नाशिकच्या उद्योगांचा विकास करत असतांना प्रदूषणकारी कारखाने येता. नाशिक पर्यटन, मेडिकल, शैक्षणिक हब म्हणून विकसित करण्याची क्षमता आहे. त्यादृष्टीने नाशिकचा औद्योगिक विकास देखील व्हावा अशी मागणी त्यांनी केली. शहरात लोकसंख्या वाढत असून दिवसेदिवस शहरातील वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्येचा सामना करावा लागत आहे. शहराची भौगोलिक रचना आणि येथील प्रशस्त रस्त्यांची नेहमीच अनेकांना भुरळ पडते. नाशिक शहरासाठी आम्ही अंतर्गत आणि बाह्य रिंग रोड आम्ही तयार केले आहे. मात्र आता त्याचे नुतणीकरण करण्याची गरज आहे.काही ठिकाणी या रिंग रोडचे रुंदीकरण गरजेचे आहे. त्यासाठी भुसंपादन करणे गरजेचे आहे. काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटीचा आणखी एक रिंग रोड नाशिककरांसाठी देऊ अशी घोषणा केली होती मात्र सध्या जो रिंग रोड आहे त्याचीच दुरुस्ती केल्यास मोठा फायदा नाशिककरांना होईल आणि शासनाचे पैसे देखील वाचतील. सिंहस्थ कुंभमेळ्याने नाशिकला आंतरराष्ट्रीय नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. या विश्वस्तरीय सोहळ्याची तयारी मागील अनुभवानुसार किमान तीन-चार वर्षे अगोदरपासूनच होणे अपेक्षित आहे. मात्र अद्याप तशी तयारी सुरू झाली नाही. २०२६-२७ ला हा सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे मात्र सिंहस्थ कुंभमेळ्याचा साधा उल्लेख देखील अर्थसंकल्पात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पायाभूत सुविधांची उभारणी ही ऐन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर करता येणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!