HomeCrimeचार हजारांची लाच घेतांना 3 पोलिस अमलदारांना अटक

चार हजारांची लाच घेतांना 3 पोलिस अमलदारांना अटक

 

जळगाव : बामणोद

 

पत्याचा क्लब सुरळीत चालू ठेवण्यासाठी पोलिस फौजदारसह दोघां पोलिस अंमलदारांना ४ हजारांची लाच घेतांना ताब्यात घेतले. जळगाव जिल्ह्यातील फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील बामणोद येथे पत्त्याचा क्लब आहे. फैजपुर पोलीस स्टेशनचे बामणोद बीटचे पोलिस अमंलदारांनी यांनी तक्रारदार यांना पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता सदर जुगाराचा क्लब सुरळीत चालु राहु देण्याच्या मोबदल्यात दरमहा ४ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी फैजपुर पोलीस स्टेशन येथे पैसेची मागणी करणाऱ्या ची भेट घेण्यास गेले असता . फोनवर बोलून लाचेच्या रक्कमेत तडजोड करून सदर लाच रक्कम संशयित क्र 1 हेमंत वसंत सांगळे (वय-५२ स.फौ.९१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव) यांना देण्यास सांगितले. तक्रारदार यांचेकडे संशयित क्र 1 यांची संशयित क्र २ किरण अनिल चाटे (वय ४० पो.ना./९३० नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव) हया दोघांसाठी 3 हजार रुपये लाचेची मागणी करत. पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेतील अंमलदारांसाठी १ हजार अशी दरमहा ४ हजार रु.प्रमाणे लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम संशयित क्रं.१ यांनी पंचासमक्ष स्वतःस्विकारू संशयित क्रं.३ महेश ईश्वर वंजारी (वय-३८ वर्ष, पो.ना./२०१२ नेम.फैजपुर पोलीस स्टेशन ता.यावल जि.जळगाव)
यांच्याजवळ दिली. तिन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव.
शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव
एस.के.बच्छाव, फौजदार .दिनेशसिंग पाटील,पोलिस नाईक .ईश्वर धनगर, अमंलदार राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!