HomeCrimeकोयता हल्ल्याची मालिका सुरूच ;अंबड परिसरात टपरी चालकावर चाकूने हल्ला*

कोयता हल्ल्याची मालिका सुरूच ;अंबड परिसरात टपरी चालकावर चाकूने हल्ला*

*कोयता हल्ल्याची मालिका सुरूच ;अंबड परिसरात
टपरी चालकावर चाकूने हल्ला*

नाशिक : अबंड

टपरीवर साहित्य घेण्यासाठी गेलेल्या मद्यपी युवकांनी पैसे देणे घेण्याच्या वादातून टपरी चालकावर धारदार चाकूने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केला. सदर    प्रकार रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अंबडच्या सिमेन्स कंपनी समोर घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबडच्या सिमेन्स कंपनी च्या समोरील बाजूस एक टपरी चालका कडे अज्ञात मद्यपान केलेले तीन ते चार युवक टपरीवर साहित्य खरेदी करण्यासाठी थांबले होते.  यावेळी पैसे देणे घेण्यावरून वाद झाल्याने मद्यपान केलेल्या तरुणांनी थेट टपरीचालकावर धारदार चाकूने वार केले.  यावेळी टपरी चालकाला वाचवण्यासाठी आलेल्या हार्डवेअर व्यवसायिकावरही हल्लेखोरांनी वार केले. सदर प्रकार अन्य व्यवसायिक तसेच  समजताच  घटनास्थळी हल्लेखोरांना बेदम चोप दिला.  या घटनेत हल्ले खोर  झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अंबड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!