HomeCrimeशहरात कोयता गँगची दहशत

शहरात कोयता गँगची दहशत

शहरात कोयता गँगची दहशत

नाशिक : शहर

नाशिक पोलीस आयुक्तालयात कोयता गँगने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नाशिकरोड, सातपूर, अंबड पंचवटी, गंगापूर रोड, म्हसरुळ या पोलीस ठाण्यात कोयत्याने हल्ला झाल्याच्या आठवड्याभरात एक तरी घटना घडली आहे. नाशिक रोड येथील गोरेवाडी परिसरात वंचित बहुजन आघाडीचे संदीप काकळीज यांच्यावर घरावर कोयता गँगने हल्ला केला होता. अंबड परिसरात गळा चिरून युवकाची हत्या करण्यात आली होती. गंगापूर मधील धुर्वे नगर मध्ये मातेने चिमुकली चा गळा चिरुन हत्या केली. म्हसरुळ परिसरात शालेय विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. पंचवटी फुले नगर येथे हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सातपूर परिसरात कार्बन नाका परिसरात चारचाकी वाहनाला धडक देत गोळीबार करत हल्ला करण्यात आला. याच परिसरात बेकरी चालकांवर कोयता गॅंग हल्ला केला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पानटपरी चालकांवर हल्ला करण्यात आला आहे. सर्रास पणे कोयता हातात घेत दिवसा ढवळया हल्ले करण्यात येत आहे. हाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास नाशिक पोलीस आयुक्तालय कमी कुठे पडत आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये घटना कैद होऊन ही आरोपींना अटक होत नाही. तोच दुसरा संशयित आरोपी कोयत्याने हल्ला करीत नाशिकमध्ये दहशत पसरवत आहेत . कोयता दहशतीचे प्रकार हे विशिष्ट विभागातच सुरू आहेत. नाशिक रोड मधील देवळाली गाव, गोरेवाडी, जेलरोड परिसरातील सलम विभाग, सातपूर मधील शिवाजीनगर कार्बन नाका परिसर अंबड येथील सीमांस कंपनीचा परिसर आणि सलम विभाग पंचवटी येथील फुलेनगर परिसर वाघाडी परिसर अशाच ठिकाणी कोयता गँगची दहशत असल्याची प्रथम दर्शनी माहिती दिसून येत आहे. या घटना बघता पोलीसांचा अकुंश कुठे तरी कमी पडत असल्याचे चित्र आहे . कोयता कुठून बनवला जातो. कोयता बनवणारे कारागीर कोण आहेत. कोयता कुठून मिळतो. त्याला धार लावण्याच्या सुविधा कुठे उपलब्ध आहेत. या सगळ्यांचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. सध्या तरी नाशिक शहर हे
कोयता गॅंगच्या दहशतीखाली असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लवकरच कोयता गँग व मोरक्याचा बंदोबस्त करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची अपेक्षा नाशिककर यांनी व्यक्त करत आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!