Homeनाशिक लोकलश्रीरामस्थ व गरुडरथोत्सव मार्गाची पोलीस व अन्य विभागांकडून पाहणी

श्रीरामस्थ व गरुडरथोत्सव मार्गाची पोलीस व अन्य विभागांकडून पाहणी

 

 

नाशिक : पंचवटी

श्रीरामस्थ व गरुडरथोत्सव मार्गाची पोलीस व अन्य विभागांकडून पाहणी रामनवमीनंतर येणा-या कामदा एकादशीला  श्रीरामरथ व गरुडरथ  पंचवटी व सरकारवाडा परिसरातुन मिरवणुक काढण्याची परंपरा आहे. या  पार्श्वभुमिवर पोलिस आयुक्त  अंकुश शिंदे  यांच्या  सुचनेनुसार पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१,  पोलीस प्रशासन विभाग, स्मार्टसिटी, महानगरपालिका, विदयुत विभाग, दुरसंचार विभागाचे अधिकारी व कर्मचारी,  श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त तसेच रथोत्सव पदाधिका-यांसमवेत आज सोमवारी  रोजी सकाळी ०७.३० ते सकाळी ०९.१० वा. पावेतो रथोत्सव मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली.

श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून रथोत्सव मार्गाच्या पाहणी दौ-याला पायी सुरवात करण्यात आली. श्रीरामस्थ व गरुडरथ ज्या मार्गाने नेले जातात त्या नागचौक, काटयामारूती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखालील भाग, नेहरू चौक, रोकडोबा तालीम, म्हसोबा पटांगण, गौरीपटांगण, सरकारवाडा, भांडीबाजार, कपुरतळा मैदान, कपालेश्वर येथील रस्त्याची पाहणी केली. तसेच श्रीरामस्थ व गरूडरथ यांची देखील पाहणी केली व सदरवेळी श्रीकाळाराम मंदिराचे विश्वस्त यांचेकडून मिरवणुकीदरम्यान येणारे रस्त्यावरील अडीअडचणी जाणून घेतल्या.

सदरवेळी उपस्थित असलेले स्मार्टसिटी, मनपा, विदयुत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना विशेषतः श्रीरामस्थ व गरुडरथ मिरवणुक मार्गावरील सध्या रस्त्याचे डांबरीकरण अथवा कॉक्रीटीकरणाची कामे करून घेणे, अनावश्यक खडी/कच उचलून घेणे, उतार सुलभ करणे इ. बाबींची पुर्तता करणेबाबत स्मार्टसिटी व मनपा विभागाचे अधिकारी यांना सुचना केली आहे. तसेच विदयुत विभागाचे इलेक्ट्रीक वायर्स हया खाली आल्या असुन त्या श्रीरामस्थ व गरूडस्थ यांना अडथळा निर्माण करू शकतात त्यामुळे विदयुत तारा या उंच करून धणे बाबत महावितरण विभागाचे अधिकारी यांना सुचना केली आहे. मिरवणुक मार्गावरील अतिक्रमण हटविणे, अनाधिकृत बॅनरर्स (होर्डिंग्ज) काटणे, मिरवणुकमार्गावरील धोकादायक वृक्षांची छाटणी करणेबाबत महानगर पालिका विभागाचे अधिकारी यांना समक्ष सुचना करण्यात आलेल्या आहेत. जी कामे चालु आहेत ती त्वरीत पुर्ण करणेबाबत सुचना केली आहे. त्याबाबत संबंधित विभाग प्रमुखांना लेखी पत्र देखील पाठविले आहे.

सदर पाहणीदौ-या वेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण,   डॉ. सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग,  गंगाधर सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  डॉ. सिताराम कोल्हे सरकार वाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक  साजन सोनवणे, वपोनि सरकारवाडा पोलीस स्टेशन, भद्रकाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक  दत्तात्रय पवार,  नरेंद्र शिंदे, विभागीय अधिकारी, पंचवटी विभाग, नाशिक महानगर पालिका,  किसन कानडे, डेप्युटी जनरल मॅनेजर, स्मार्टसिटी कंपनी,  प्रदिप दाळु, अति. कार्यकारी अभियंता, विदयुत विभाग, बि.एस.एन.एल विभागाचे अधिकारी, तसेच (श्रीकाळाराम मंदिर विश्वस्त)  मंदार जानोरकर, .धनंजय पुजारी, व अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, साफसफाई विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!