Homeनाशिक लोकलजिल्हा परिषदेत पाच दिवसात किती निधी खर्च होणार 

जिल्हा परिषदेत पाच दिवसात किती निधी खर्च होणार 

जिल्हा परिषदेत पाच दिवसात किती निधी खर्च होणार

नाशिक : जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषदेला यावर्षी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ४५१ कोटी रुपयांपैकी आतापर्यंत सुमारे ८२ टक्के निधी खर्च झाला आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यास आता केवळ ५ दिवस उरले असून या कालावधीत १८ टक्के निधी खर्च अर्थात सुमारे ८० कोटी रुपये अखर्चित राहण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनी निधी खर्चाबाबत आढावा घेण्याचे जाहीर करून पंधरा दिवस उलटले. आढावा बैठक किंवा निधी खर्चाबाबत समाधानकारक प्रगती झालेली नाही. दरम्यान, मागील वर्षी जिल्हा परिषदेने वेळेत खर्च न केल्यामुळे ४५ कोटी रुपये निधी परत गेला होता. त्यामुळेच यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून २०२२- २३ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ४४१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निधी खर्चाचा आढावा घेतला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेसमोर ९० दिवसांमध्ये जवळपास १०० कोटी रुपये खर्च करण्याचे आव्हान होते.

सर्वाधिक  ७३ टक्के निधी हा बांधकाम विभागाचा खर्च झालेला आहे. बांधकाम विभाग दोनचा खर्च ७१ टक्के आहे. जिल्हा निधी खर्च करण्याच्या प्रमाणात ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सर्वांत कमी म्हणजे ४३ टक्के इतकाच खर्च आहे. त्यानंतर कृषी (४५ टक्के), आरोग्य (घर टक्के), महिला व बालविकास (६९ टक्के) असा या विभागांचा खर्च झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!