१ कोटी ८० लाखांची शेतकर्यांची फसवणूक
नाशिक : शहर
टोमॅटोची खरेदी करून शेतकऱ्यांची एक कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फरारी टोमॅटो व्यापाऱ्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात टोमॅटो व्यापारी नौशाद फारुकी व समशाद फारुकी यांनी सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या चार महिन्यांच्या कालावधी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. मात्र, त्यांचे पैसे दिले नाहीत. ज्या शेतकऱ्यांना त्यांनी धनादेश दिले. ते धनादेश त्याच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने बाउन्स झाले आहेत. या व्यापाऱ्याकडून १७९ शेतकऱ्यांना सुमारे एक कोटी ८० लाख रुपये घेणे बाकी आहे. व्यापारी पैसे न देताच सध्या फरार आहेत. बाजार समिती कार्यालयात शेतकऱ्यांनी सचिव अरुण काळे यांची भेट घेऊन त्यांना
मांडल्या. व्यापाऱ्यावर कारवाई करून, त्याचे गाळे व मालमत्तांचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिवांबरोबर प्रशासक, तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत अर्ज दिले आहेत.