HomeCrimeशहर पोलिसांकडून 'एमपीडीए'चे प्रस्ताव

शहर पोलिसांकडून ‘एमपीडीए’चे प्रस्ताव

 

नाशिक : शहर

शहरातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या  टोळक्यांविरोधात ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आला  आहे. तीन  महिन्यांत दोन प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने कारवाई पूर्ण  झाली आहे. तर पंधरा प्रस्ताव आयुक्तालयाने वरिष्ठस्तरावर  पाठवले आहे . शहरात झालेल्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये टोळक्यांचा समावेश असल्याची गंभीर बाब समोर येत असल्याने कठोर कारवाईची भूमिका पोलीस आयुक्तालयाने घेतली आहे. त्यामुळे या कडक स्वरूपाच्या कारवाईमुळे शहरातील टोळक्यांचा  उपद्रव नियंत्रित होण्याची शक्यता आहे. पंचवटीतील गोळीबारासह धारदार कोयते घेऊन फिरणे, सातपूरमधील गोळीबार व कोयत्याने हल्ला,  अंबडमध्येही सशस्त्र हल्ल्यात टोळक्यांचा समावेश पुढे आल्याने अन्य  पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही गुंडांचे टोळके विविध गुन्ह्यांत सक्रिय असल्याची बाब तपासात उघड झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सराईतांचे रेकॉर्ड तपासून करण्यात आली आहे. कारवाई प्रस्तावित केली आहे. दरम्यान झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (एमपीडीए)  कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!