वृक्ष तोड प्रकरणी चार गुन्हे दाखल
नाशिक : शहर
वृक्षतोड़ करताना पंचवटी महापालिका प्रशासन, उद्यान विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच वेगवेगळ्या जातीच्या झाडांवर बेकायदेशीर कुऱ्हाड चालविणे चौघांना चांगलेच महागात पडले आहे. वृक्षतोड केल्याप्रकरणी चौघा जणांवर आडगाव तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिकेने त्यांना तब्बल नऊ लाख रुपयांचा दंड केला आहे.
म्हसरूळ शिवारातील मखमलाबाद सर्व्हे क्रमांक १९ बोरगड कणसरा चौक येथे संशयित अतुल प्रेमसुख सोमानी यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत असलेले आठ वृक्ष गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बुंध्यापासून तोडल्याचे निदर्शनास आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना याच परिसरातील सिताई रो हाऊस येथे घडली.
संशयित आरोपी के.बी. अमृतकर यांनी त्यांच्या जागेत असलेले कडूनिंबाचे वृक्ष बुंध्यापासून तोडले. तिसऱ्या घटनेत आडगाव शिवारात एका अज्ञात व्यक्ती व संशयित अशोक रामकृष्ण झोपे यांनी विनापरवाना वृक्षतोड केली . पालिका प्रशासनाने तिघांनाही नऊ लाख रुपये दंडाची स्वत नोटीस पाठविली आहे. मनपा उपायुक्त विक्रेत्याकडे विजयकुमार मुंडे, विभागीय अधिकारी निर्णयाचा फट व वृक्ष प्राधिकरण अधिकारी नरेंद्र दिव्यांगसह मुद्र शिंदे, यांच्या आदेशाने मनपा उद्यान निरीक्षक वसंत ढुमसे, वैभव वेताळ बसण्याची यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.