जळगाव : रावेर
तलाठी व कोतवाल यांना ४ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव पथकाने कारवाई केली. तक्रारदार यांची वडीलोपार्जीत शेती खिरोदा तलाठी कार्यालय हद्दीमध्ये आहे. तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे ( वय-४५ वर्ष, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव ) व कोतवाल शांताराम यादव कोळी (वय-५२ वर्ष, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता.रावेर जि.जळगाव) दोघांनी ४ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा येथे दोघांनी लाच स्वीकारतांना अटक केली. सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. एस.के.बच्छाव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने आदीच्या पथकाने केली.