Homeनाशिक लोकलशहर व जिल्ह्यातील रुग्णालयात सुंदर माझा दवाखाना उपक्रमास प्रारंभ

शहर व जिल्ह्यातील रुग्णालयात सुंदर माझा दवाखाना उपक्रमास प्रारंभ

 

शहर व जिल्ह्यातील रुग्णालयात सुंदर माझा दवाखाना उपक्रमास प्रारंभ

नाशिक : जिल्हा

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नाशिक जिल्ह्यात ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम आजपासून आठवडाभर राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५९२ आरोग्य उपकेंद्र, ३२ ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय स्त्री व बालरुग्णालय या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

यावर्षीचे जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य सर्वांसाठी आरोग्य हे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून सर्वांना आरोग्यविषयीच्या समान सुविधा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ७ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे.  सर्व सार्वजनिक क्षेत्रातील दवाखाना परिसराची स्वच्छता, त्यातील सर्व विभागांची स्वच्छता, स्वच्छतागृहे, भांडारगृहे इत्यादींची स्वच्छता करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे.

 

मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात व  शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबण्यात येणार 

शहरांतील सामाजिक  संस्था, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यमंत्र्यांनी राज्यभर हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले. आहेत. ‘सर्वांना आरोग्य समता, आरोग्य सुविधा’ ही यावर्षीच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे. या अनुषंगाने मनपा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘आणि शहरी सामुदायिक आरोग्य केंद्रात हा उपक्रम दि. ७ ते १४ एप्रिल २०२३ या कालावधीत राबविला जाणार आहे.

 

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!