नाशिक : शहर
जत्रा हॉटेल ते नांदुर नाका रोड कुंदन हॉटेल समोरील रोडवर, आडगाव नाशिक येथे गुरुवारी (दि ६) वैभव दिलीप भडांगे (वय २४ वर्षे, रा. वडजाई) पांढरे रंगाची छोटा टेम्पो सह एकुण ४ लाख १५ हजार ३३३ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु विक्रीसाठी संशयित अब्दुल रहमान उर्फ राहिल मेहमुद फारूकी (वय-३४ वर्षे, रा. मोतीसुपर मार्केट, फ्लॅट नं. १०६, भक्तीधाम मंदिरासमोर, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असतांना विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना, वाहतुक करतांना व साठवतांना मिळुन आल्याने सदरचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरूद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, त्या अंतर्गत नियम आणि नियमन यांचे अंतर्गत कलम कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास आडगांव पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे, पोलिस निरिक्षक प्रविण चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोहवा संजय ताजणे, पोहवा देवकिसन गायकर, पोना नितीन भालेराव, पो.ना. रविंद्र दिघे, पोअ अनिरूध्द येवले, पो.अ. चंद्रकांत बागडे, पोअ अविनाश फुलपगारे आदीच्या पथकाने केली आहे.