October 10, 2026

पी आर पी ने केला भाजी विक्रेत्या महिलांचा सन्मान: महिला दिन

0

🔵 जागतिक महिला दिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे भाजी व फळ विक्रेत्या महिलांना पुष्पगुच्छ देत सन्मान!nnनाशिकरोड | दिनांक ८ मार्च संपूर्ण जगात महिलांच्या कर्तुत्व आणि त्यागाच्या सन्मानार्थ महिला दिन साजरा केला जातो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी तसेच गृहिणी म्हणून कुटुंबाचा आधार असे बरेच पात्र एक महिला आपल्या आयुष्यात साकार करत असते. आणि ती त्यात परिपूर्ण देखील होते. अशा नारी शक्तीला सलाम व सन्मान करण्यासाठी आज नाशिक, जेलरोड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वरिष्ठांच्या आदेशाने पार्टीच्या वतीने भाजी व फळ विक्रेत्या महिलांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या नावाचा जयघोष करीत. सर्व महिलांना आजच्या दिनाचे महत्त्व सांगत. त्यांनी देखील धाडसाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून यश मिळविले पाहिजे हे सांगण्यात आले.nयावेळी पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष शशिभाई उन्हवणे यांनी महिला माता-भगिनींना पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मानित केले. nकार्यक्रम स्थळी साहित्यिक साराभाई वेळुंजकर, राज निकाळे, दादाभाऊ शिंदे, जावेद शेख,शादाब शेख, रफिक टकारी, सुनीता कर्डक, मीनाताई पगारे, संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे, अल्का निकम, ज्योती, आहिरे, रोशनी बन्सी, निर्मला सोनवणे, गयाबाई काळे, ज्योती अहिरे, इंदुबाई शिंगाडे, धोंडाबाई माने, अंजना भोसले, रिटा बारसे, रशिदा अन्सारी, आदी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *