October 6, 2026

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन (सिटू), 

0

मुख्य कार्यालय: सिटू कामगार भवन, खुटवड नगर, कामटवाडे, नाशिक -८.7/110 लक्ष्मी मार्केट इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूnnबांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी सांगली येथील कामगार मंत्रीnnमा. ना. श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चा…nnदिनांक 11/9/2023 रोजी बांधकाम कामगारांच्या प्रश्नासाठी सांगली येथील कामगार मंत्री मा. ना. श्री सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा करण्यात येणार आहे.  महाराष्ट्र सरकारने 2007 साली बांधकाम कामगारासाठी कायदा केला,आणि 2008 साली कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या माध्यमातून आज अखेर 30 पेक्षा जास्त योजना राज्यातील बांधकाम कामगारांना लागू आहेत,मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसलेने योजनांचा लाभ वेळेवर कामगारांना मिळत नाही. योजनाचा लाभ देताना अधिकारी लागू नसलेल्या अटी लावून कामगारांचे नोंदणी/नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज चुकीचे कारण दाखवून त्रुटीत काढतात, अनेक लाभाचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा त्याचा लाभ अनेक वर्षे मिळालेला नाही, त्याबाबत मंडळाच्या स्थानिक आणि मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क करून सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच मंडळ स्थापन झाले पासून अनेक कामगार 60 वर्षे वय पूर्ण झालेमुळे ते नोंदणी आणि लाभापासून वंचित आहेत. त्यांना पेंशन लागू करणेबाबतचा निर्णय अद्याप मंडळाने घेतलेला नाही.nnतसेच गेली दोन वर्षे कोरोनापासून बांधकाम कामगारांना काहीही दिवाळी दसरा भेट अनुदान मिळालेले नाही. ते दसरा दिवाळी अनुदान वार्षिक रु 10,000 प्रमाणे यावर्षी मागील फरकासह रु. 30,000 जाहीर झाले पाहिजे. गेली चार वर्षे कल्याणकारी मंडळ, सल्लागार मंडळ आणि तज्ञ समितीवर अशासकीय सदस्य नेमले नसल्यामुळे तिन्ही कमिटीचे काम मंडळाचे सचिव व अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुरु आहे. त्यामुळे सगळा एकतर्फी कामकाज कामगारांच्याबाबत चालू आहे. गेल्या सव्वावर्षात बांधकाम कामगार संघटनाबरोबर एकदाही बैठक आपण घेतलेली नाही. कांही चुकीच्या योजना सुरु करून मंडळाच्या पैशाचा विनाकारण अपव्यय चालू आहे. मंडळाचा प्रचंड पैसा खर्च केला जातोय, मात्र तो कामगारावर नाही. कामगारांच्या नावावर इतरांनाच त्याचा प्रचंड लाभ होत आहे वगैरे प्रश्नाबाबत्त संघटनेने गेली दोन वर्षे मंडळाकडे पाठपुरावा करूनही त्यावर दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये सुधारणा व्हावी, बांधकाम कामगारांना त्याचे लाभ लवकर मिळावेत म्हणून कामगार मंत्री मा. ना. श्री सुरेशभाऊ खाडे सांगली येथील कार्यालयावर सोमवार दिनांक 11/9/2023 रोजी दुपारी 12:00 ते 04:00 या वेळेत महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा राज्यव्यापी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.nnमोर्चाच्या मागण्या खालील प्रमाणे….nn1) दिनांक 7/8/2023 रोजी जाहीर केलेली “तपासणी ते उपचार आरोग्य योजना” अपूर्ण व किचकट असलेने त्याकरिता कामगार प्रतिनिधी आणि वैद्यकीय तज्ञांची समिती नेमून तिचा विस्तार करावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील मोठे दवाखाने जोडून कामगारांना डायरेक्ट उपचार मिळाले पाहिजेत. म्हणजे बंद केलेली मेडिक्लेम योजना चालू कराnn2) नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज दाखल झालेपासून एक महिन्यात निकालात काढले पाहिजेत, त्यात मंडळाशिवाय R.O. ना वेगळे अधिकार असू नयेत.nn3) अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर म्हणून मेसेज आले आहेत मात्र खात्यावर पैसे आलेले नाहीत ते तात्काळ कामगारांच्या खात्यावर जमा करावे.nn4) डी. फार्म साठी 25 हजार आणि बी. फार्म साठी 20 हजार हा निर्णय अन्यायकारक आहे त्यात दुरुस्ती करा आणि बी फार्म, एम. फील, पी.एच.डी. शिक्षणाकरिता एक लाख रुपये विद्यावेतन लागू करा.nn5) घरकुल मधील जाचक अटी रद्द करा, वडील किंवा सासरे यांच्या नावाने असलेल्या जागेच्या संमतीवर अर्ज मंजूर करा व मंजूर अर्जांना ताबडतोब अनुदान द्या. त्यातील् मंत्रालयीन स्टेप कमी करा. प्रलंबीत अर्जांचा ताबडतोब निपटारा करा.nn6) आरोग्य योजनेच्या नावावर रक्त तपासणीचा ठेका रद्द करा त्या बदल्यात बांधकाम कामगारांचा 10 लाख रुपयांचा व्यक्तिगत कुटुंबाचा विमा उतरा.nn7) अपघात किंवा संकटकाळी कामगारांना दुसऱ्या दवाखान्यात अडमिट केल्यास त्याच्या खर्चाचा परतावा मिळणे बाबत मंडळाने स्वतंत्र निर्णय करावा.nn8) 18 ते 60 वयोगटातील कामगार मयत झाल्यास त्याला नैसर्गिक मृत्यू लाभ मिळाला पाहिजे या बाबत मंडळाने निर्णय घेतला आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करा.nn9) ग्रेस पिरियड मधील कामगारांना नैसर्गिक व अपघाती मृत्यू लाभ मिळाला पाहिजे, तसेच कोविड काळातील मृत्यू व बाधित कामगारांना लाभ देणेबाबत मंडळाने केलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा.nn10) मध्यान्ह भोजन योजना बंद करून प्रत्येक नोंदीत कामगारांच्या खात्यावर महिना 3800 रुपये दिले पाहिजेत.nn11) नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज सर्चिंग पद्धतीने न काढता रोटेशन पद्धतीने सर्वांना समान न्यायाने काढले पाहिजेत, त्यामध्ये गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या अधिकारी /कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.nn12) नोंदीत महिला कामगारांना गरोदर काळात सहा महिने सहाय्यक अनुदान देणेच्या मंडळाच्या झालेल्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करा.nn13) मुंबई सारख्या मोठ्या शहरातील कामगारांना नाक्यावर थांबण्यासाठी शेड उभी करा आणि पाणी, संडास, मुतारी सारख्या तत्सम सुविधा द्या. तेथील नोंदणी साठी रेशन कार्ड ची अट रद्द करा व वशिले सिस्टीम बंद करा.nn14) 60 वर्षावरील नोंदीत कामगारांना महिना 5000 रुपये पेंशन योजना लागू करा आणि सक्षम कामगारांना 65 वर्षापर्यंत काम व नोंदणीची मुदत वाढवा.nn15) नोंदीत महिला किंवा बांधकाम कामगाराच्या पत्नीला प्रसूती लाभ घेताना मुलाचे नाव रेशन कार्डवर असले पाहिजे ही जाचक अट रद्द करा.nn16) अनेक कार्यालयात वेळेत अर्जांची अधिकाऱ्याकडून तपासणी होत नाही त्यामुळे अर्ज तपासणीवेळी एकापेक्षा जास्त 90 दिवसाचे दाखले मागितले जातात, ते काम एकच दाखल्यावर झाले पाहिजे.nn17) योजनांचा लाभ कामगारांना लवकर मिळण्यासाठी जिल्हा कार्यालयाकडे पूर्वीप्रमाणे निधी दिला जावा.nn18) राज्यात मोठ्या संख्येने बांधकामे चालू आहेत, त्यातून मंडळाचा सेस जमा झाला की नाही यावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा.nn19) येत्या दसरा दिवाळीला मागील दोन वर्षासह रु. 30 हजार रुपये दिवाळी दसरा अनुदान जाहीर करावे.nn20) मंडळाच्या तिन्ही कमिट्या कल्याणकारी मंडळ, सल्लागार मंडळ, आणि तज्ञ समिती वर कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी आणि आस्थापना प्रतिनिधी यांची नियुक्ती करा तसेच त्यावर सिटूचे प्रतिनिधी घ्या.nn nnया सर्व प्रश्नावर चर्चा करणेसाठी आम्ही दिनांक 11/9/2023 रोजी सांगली येथील कामगार मंत्री मा. ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयावर मोर्चाने जाणार आहोत. त्यावेळी कामगार मंत्र्यांनी आणि कामगार व इमारत व इतर बांधकाम मंडळाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून आम्हाला न्याय द्यावा, हि मोर्च्याव्दारे मागणी करीत आहोत.nnसिटू राज्य सचिव व बांधकाम फेडरेशन महासचिव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *