नाशिक रोड मधील गुटख्याचा कारखाना पोलिसांनी केला उध्वस्त
प्रतिबंधित गुटखा निर्मीती करणारा कारखाना नाशिकरोड पोलीसांनी केलं उध्वस्त, २,१३,९२०/- रु. किमतीच्या मुद्देमालासह ३ इस्मांना केली अटकnnमहाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना सुद्धा शासनाचे आदेश डावलून बनावट गुटका नाशिक रोड परिसरातील एकलहरे येथे बनविला जात होता सदरचा बनावट कारखाना नाशिक रोड पोलिसांनी उध्वस्त केला असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.nnनाशिक रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांना गुप्त खबर मिळाली की एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रालगत च्या रस्त्याने सामनगाव शहरातील मातृछाया फार्म हाऊसच्या समोर एका जुन्या घरात बनावट गुटखा बनविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके हवालदार पुंडलिक टेपने संतोष पिंगळ पोपट पवार अविनाश हांडे बाळकृष्ण सोनवणे ताज कुमार लोणारी आदींनी छापा टाकून लाखो रुपयाचा बनावट माळ जप्त केला त्यामध्ये गुटखा बनविण्याचे मशीन तसेच केमिकल विविध कंपन्यांच्या नाव असलेले लेबल गुटखा बनविण्यासाठी लागणारा बनावट कच्चामाल जप्त करण्यात आला आहे या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
