स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्प्र
प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प l नाशिकरोड :- शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात सभासदांच्या प्रतिसादात संपन्न झाली. “इतनी शक्ति हमे देना दाता, मनका विश्वास कमजोर हो ना’ या प्रार्थनेनंतर जयराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. अत्यंत खेळीमेळीत संस्थेचे कामकाज पार पडले. संजय शेलगावकर या़ंनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचलन केले.
सभेचे कामकाज व्यवस्थित होण्यासाठी उपाध्यक्ष सुरेश पारुंडेकर, सचिव अविनाश गोसावी, कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, सहसचिव रविंद्र चंद्रात्रे, सहकोषाध्यक्ष श्रीपाद जहागिरदार, सहसचिव संजय शेलगावकर, सहकोषाध्यक्ष शरद वैद्य,ॲड. गोविंद पांडे, चांगदेव बोराडे, विश्वास पगार, भिकाप्पा नीळकंठ, श्रीकांत मोहरील, एस.एल.सोनवणे, सुनंदा गोसावी, वैजयंती चंद्रात्रे, मंगल मोहरील, वैदेही कुलकर्णी, रेखा जहागीरदार, रेखा नाशिककर, मुग्धा कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन रवींद्र चंद्रात्रे यांनी केले.