प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :-जिल्हाभरात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह ३९ जणांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.
देवळाली कॅम्प येथील डॉ गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात शनिवार दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, आ. सरोज आहिरे, मविप्र सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे, कॅन्टोन्मेंट सदस्य प्रीतम आढाव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रतन चावला, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, यासह विविध दैनिकांचे संपादक व मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. नाशिक मराठी पत्रकार संघाची बैठक अध्यक्ष सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. यावेळी पुरस्कार्थीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रिंट मीडियासाठी गोपाळ पालीवाल ( महाराष्ट्र टाइम्स ), निशिकांत पाटील (देशदूत), चंद्रमणी पटाईत (गांवकरी), विकास गामणे (सकाळ), जितेंद्र साठे (लोकमत ), अमोल यादव (पुण्यनगरी), विवेक आहेरराव ( दिव्यमराठी ), मुकुंद बाविस्कर (भ्रमर ), स्वप्नील येवले (आपलं महानगर), दीपिका वाघ (पुढारी), दिनेश जाधव (लोकनामा), किशोर मकासरे (नवराष्ट्र), डॉ. निलेश पाटील (न्यूज मसाला ), खुशाल पाटील (महाराष्ट्र लाईव्ह ), प्रमोद रहाणे (एबी न्यूज), ऋतिक गणकवार (९ न्यूज महाराष्ट्र ), संदीप नवसे (जागर जनस्थान) यांसह वृत्तपत्र विक्रेते संपदा फडके (नाशिकरोड), कृष्णाजी खैरनार (देवळाली कॅम्प), विलास गुंबाडे (नाशिक) आदींसह विशेष पुरस्कार्थींमध्ये पोलिस अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , ग्रामपंचायत शिंदे, राजपार्वती फाउंडेशन (गिरणारे ), सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती (देवळाली कॅम्प), ग्रामपंचायत लोहशिंगवे, म्हसरूळ सार्वजनिक वाचनालय (म्हसरूळ),
सावन कृपाल रुहानी मिशन (देवळाली कॅम्प), विजया चतुर-लिलके, (शैक्षणिक), दारणेश्वर महादेव देवस्थानम-पळसे, श्री ईच्छापूर्ती शिव मंदिर समिती, लहवित रोड (धार्मिक), निलेश धोंगडे (क्रीडा), गणेश कुवर (सायकलिस्ट) किसन अहुजा, संजय भालेराव, पंकज शेलार (सामाजिक ), शालिनी पेखळे (साहस ), ज्ञानेश्वर ढिकले (कृषी), सागर कुलकर्णी (सांस्कृतिक), भाऊसाहेब शिरोळे (उद्योजक) आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला जाणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थापक मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुनील पवार, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे, नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष अरुण बिडवे, सरचिटणीस अरुण तुपे, उपाध्यक्ष प्रविण आडके, दिपक कणसे, खजिनदार वसंत कहांडळ, संजय निकम, प्रकाश उखाडे, सुभाष कांडेकर, प्रशांत धिवंदे, नंदकुमार शेळके, संतोष भावसार, भास्कर सोनवणे यांसह पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.