HomeUncategorizedनाशिक लोकसभा मतदारसंघात सुख सुविधा देण्यासाठी सदैव कुटीबद्ध- खा. हेमंत गोडसे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात सुख सुविधा देण्यासाठी सदैव कुटीबद्ध- खा. हेमंत गोडसे.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- नाशिक लोकसभा मतदारसंघात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुख सुविधा देणाऱ्या विविध योजना आणून मतदारसंघाचा पूर्णपणे विकास होत आहे. यापुढेही ही विकास गंगा अशीच सुरू राहील, यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. देवळालीच्या विजयनगर भागातील संभाजी चौक आहुजा कॉम्प्लेक्स येथे रस्ता भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून संभाजी चौक, आहुजा कॉम्प्लेक्स ते पंचमोती हौसिंग सोसायटी या रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, भगूर परिसर जेष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख, माजी नगरसेवक बाबुराव मोजाड आदींची समायोचित भाषणे झाली. बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर यांनी सदर रस्त्याबाबत खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले. या रस्त्यामुळे नागरिकांची महत्वाची समस्या मार्गी लागणार आहे. विजय नगरच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या भागातील नागरिकांना सुख सोयी देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व नासिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर यांनी सांगितले. कार्यक्रमास देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा सौ. मीनाताई करंजकर, राधाकृष्ण गामणे, प्रताप गायकवाड, भाऊसाहेब शिरोळे, जीवन गायकवाड, प्रसाद आडके, कैलास कापडणीस, बाळासाहेब सोनवणे, प्रकाश वहाडणे, योगेश करंजकर, रंगनाथ जाधव, प्रकाश वहाडणे, सुधाकर इंगळे बाळासाहेब मोरे, प्रकाश नहार, राम कांबळे,रवींद्र एखंडे, सुभाष शिंदे, वसंत खैरनार, भाऊसाहेब आव्हाड, सागर जाधव, पंडित हारक, निशांत करंजकर, अरुण कस्तुरे, बाळासाहेब देशमुख, बहिरु करंजकर, आकाश जाधव आदींसह विजयनगर भागातील नागरिक व सिद्धिविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत तानाजी करंजकर तर आभार प्रदर्शन योगेश करंजकर यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!