सरकारच्या जागेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवाल तर तुम्ही गुन्हेगार आहात असे स्पष्ट मत पोलिसांचा आहे मग अनाधिकृत ठिकाणी 100 देवालय उभारले आहेत ती अनाधिकृत नाहीत का ? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवला म्हणून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात मग देवालय उभारणार्यांवर पोलीस गुन्हा दाखल का करीत नाही असा परखड सवाल आंबेडकर अनुयायांनी केला आहे. नाशिक रोड येथील भालेराव मळ्यात काही उत्साही आंबेडकर अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा भालेराव मळा येथील वसाहतीत बसवला आणि वाधग पेटलं. सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता यानिमित्ताने भालेराव मळा येथील काही कार्यकर्त्यांनी श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेतला आणि सदरील वसाहतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा बसवला. मात्र हा पुतळा काही मनुवाद्यांच्या जिव्हारी लागला आणि संजय अशोक भालेराव व त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर पोलिसांनी 447, 488 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संबंधित फिर्याद इजाज इसाक शेख वय वर्ष 47 डी एन हरीश श्रद्धा अपार्टमेंट देवळाली गाव यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण काही गैर नाही हे संविधानाला घटनेला धरून आहे मात्र काही मनुवाद्यांच्या पोटात पोटदुखी सुरू झाली आणि बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी नको असा त्यांनी पोलिसांकडे आग्रह धरला. शासकीय कार्यालय पोलीस स्टेशन आणि काही इतर शासनाच्या मिळकतींवर खुलेआम देवालय सजली आहेत मंदिर बांधले आहेत. ते अधिकृत आहेत का ?असा खडा सवाल आंबेडकर अनुयायांनी केला आहे. दलित महा विकास चे कैलास तेलोरे यांनी शासनाला जाब विचारला आहे की सदरील देवालय हे अधिकृत आहेत का ? जर ते अधिकृत असतील तर आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अधिकृत ठिकाणी बसवतो अन्यथा अनधिकृत ठिकाणी बसवणे हे काही गैर नाही भले आंबेडकरी अनुयांवर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. काही नत भ्रष्ट मनुवाद्यांकडून जर समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर शासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे असे खडसावून सांगितले आहे. https://youtu.be/Rmnoa7C8XIk
मनुवाद्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ही टोचू लागला
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!