नाशिक-सिन्नर महामार्गावर मोहदरी घाटात शुक्रवारी (दि ९)सायंकाळी ५ च्या सुमारास तीन वाहनांमध्ये अपघात घडला. या दुर्घटनेत नाशिकातील केटीएचएम व ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे .
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे ८ विद्यार्थी स्विफ्ट कार क्र. एम. एच. 03 ए. आर. 1615 ने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परत असताना. मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ कारचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकाला धडकली. कारने पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या लेनवरील स्विफ्ट क्र. एम. एच. 12/ एस. एफ. 4542 यांच्यावर येऊन आदळली. यावेळी सिन्नरकडे पाठमागून येणारी इनोवा कार क्र. एम. एच. 18/ ए. एन. 1443 ही देखील स्विफ्ट कारवर येऊन धडकली.
विद्यार्थ्यांच्या कारमधील हर्ष दीपक बोडके (17) रा. कामटवाडा नाशिक, सायली अशोक पाटील (17) रा. राणेनगर, नाशिक, प्रतिक्षा दगु घुले रा. पाथर्डी फाटा, नाशिक, शुभम तायडे रा. शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक ( चौघे केटीएचएम महाविद्यालय) व मयुरी अनिल पाटील, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक (मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालय, ओढा) या ५ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्यार्थ्यांमधील साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील ज्ञानेश्वर दळवी हेही गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत जखमींना बाहेर काढले. सिन्नर येथील 4 रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले