भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या असे वायचळ विधान केले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची अस्मिता आहे आमचे विचार आहे आमचे ज्ञान आहे. महात्मा ज्योतिबा फुले समस्त स्री जातींचे उधारक आहे. अशा क्रांतिकारी महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र अजिबात सहन करणार नाही. चंद्रकांत पाटलांवर कारवाई व्हावी म्हणून नाशिकच्या भ्रष्टाचार विरोधी समितीने गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे चंद्रकांत पाटलान विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील ,महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत चंद्रकांत पाटलांनी चुकीचे विधान केले म्हणून त्यांच्यावर तक्रार दाखल व्हावी अशी भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी आहे यांना निवेदनावर बाळासाहेब साळवे मुस्ताक शेख संजय बाबा सानप महेंद्र तेजाळे एडवोकेट पुष्पक जगताप आदींच्या स्वाक्षरी आहे यावेळी भ्रष्टाचार विरोधी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.