मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन येथे विज वितरण कंपनीचे सबस्टेशन मधील विविध प्रकारची दुरुस्ती करणे करीता दि. 17/12/2022 रोजी सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00 वा. पावेतो महावितरकण कंपनीकडून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल असे महावितरण कंपनीने कळविले आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथून नवीन नाशिक व नाशिक पूर्व भागात होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याने शनिवार दि. 17/12/2022 रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र. 24, 25, 26, 22 भागश: व 27, 28, 29, 31 या संपूर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पूर्व मधील प्रभाग क्र. 14, 15, 23, 30 भागश: या प्रभागांमध्ये (सकाळ व सायंकाळचा संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि. 18/12/2022 रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती.
Recent Comments
on Hello world!