Homeनाशिक लोकलक्लोरीन वायू हाताळण्याबाबत मनपा कर्मचा-यांसाठी कार्यशाळा

क्लोरीन वायू हाताळण्याबाबत मनपा कर्मचा-यांसाठी कार्यशाळा

नाशिक महानगरपालिकेचे विविध जलशुद्धिकरण केंद्र, मलनि:सारण केंद्र व जलतरण तलाव येथे पाणी निर्जंतुकीकरण करण्याकरीता क्लोरीन वायुचा वापर करण्यात येतो. सदरचा वायु हा धोकादायक आहे. सदर वायूची सुरक्षितपणे हाताळणी करण्याबाबत मनपा कर्मचारी आणि अधिकारी यांच्या करीता प्रशिक्षण कार्यशाळाची आवश्यकता होती. मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागाला दिलेल्या सुचनेनुसार आज दि. 16/12/2022 रोजी निलगिरीबाग जलशुद्धिकरण केंद्र येथे कार्यशाळा संपन्न झाली. क्लोरीन उत्पादक कंपनी मे. रायलसीमा अल्कलीज आणि सदर्न केमिकल्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा पार पडली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या सहसंचालक अंजली आडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अविनाश धनाईत यांनी केले. मनपाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके तसेच रायलसीमा अल्कलीजचे जनरल मॅनेजर रंगमोहन सिंग, सदर्न केमिकल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ए. कुमार, अनुराग सहाय, अमेय जोशी, भीमा दूधभाते, राजेश गोरे या तज्ञांनी मार्गदर्शन केले. क्लोरीन वायू कसा घातक आहे?, दुर्घटना घडू नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच क्लोरीन सुरक्षितपणे हाताळणी करण्याबाबचे तंत्र तज्ञांनी यावेळी सांगितले. प्रशिक्षण शिबिरास सुमारे 75 कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यशाळेला मनपाचे कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, उपअभियंता एस. टी. जाधव, एस. जे. बेलगावकर, एस. एम. ठाकूर, आर. बी. भोये, आर. डी. सोनवणे उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिरामुळे सर्व उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना क्लोरीन वायू सुरक्षितपणे हाताळणी करण्याची सविस्तर माहिती झाली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!