बसच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी
इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून येत असताना गोंदे फाट्यावर आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्कूटी (क्र. MH 15 CZ 6557) ही रस्ता ओलांडत असताना पाठीमागून येणाऱ्या बस क्र. (MH 20 BL 0414) च्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली.
n
n
n
n
यात स्कूटीवरील किरण खोडके, वय २३ व सारिका खोडके, वय १६ हे दोन जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी वाडीवऱ्हे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
n
n
