शेख हत्या प्रकरणात आणखी चौघांना अटक
नाशिक लोकल वृत्तसेवाnर्ी नाशिकरोड : मागील भांडणाचा राग मनात ठेऊन एकावर कोयत्याने हल्ला करून हत्या करण्यात केल्याप्रकरणी उर्वरित चौघा संशयीतांना लहवित येथून उपनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.nदेवळाली गावातील सुंदरनगर येथील अरमान मुनवर शेख (वय 18) हा मंगळवारी (दि. 7) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीने रोकडोबावाडीहून जय भवानी रोडच्या दिशेने जात होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहचताच गतिरोधकाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी शेख याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढविला. त्यात पाठीवर, डोक्यावर वर्मी मार लागल्याने तो जागीचnरक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याच्याभोवती गर्दीही झाली होती. नागरिकांनी शेख याला औषधोपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयीतांचा शोध सुरू केला.nपथकाने पहाटेपर्यंत गुंड्या, रवी राठोड व आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे बाकीच्या साथीदारांची कसून चौकशी केल्यानंतर आकाश तपासे (वय-19, रा.मालधक्कारोड, नाशिकरोड), प्रेम ढेंगळे उर्फ टक्या (वय-19, रा.गुलाबवाडी, मालधक्कारोड), सुमित जाधव उर्फ चिक्या (वय-23. रा.अर्पण सोसायटी, विहितगाव), सम्यक उन्हवणे उर्फ सम्या (वय-18, रा.साईलिला अपार्टमेंट, विहितगाव बसस्टॉपच्या मागे) यांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.nगुन्हा केल्यानंतर हे चौघे लहवित येथे लपून बसले होते. पथक येण्याची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले. पथकाने सापळा रचून त्यांना जेरबंद केले. पुढील तपास रणजित नलावडे करीत आहेत.
