August 7, 2026

नळाला तर थेंबभरही पाणी येईना

0

नळाने तर थेंबही पाणी येईनाnपेठ तालुक्यात जलजीवन मिशनचा बोजावराnपेठ -nहर घर जल, असा नारा केंद्राच्या महत्वकांक्षी जलजीवन मिशनमधून देण्यात आला असून पेठ तालुक्यात मात्र या मिशनचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. मंजूर 85 कामांपैकी 77 कामे मुदत संपूनही कागदावरच असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण थांबली नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला गेला असताना यात कोटीच्या कोटी उड्डाने घेण्यात आल्याचा आरोपही केला जात आहे.nग्रामीण भागातील घरांपर्यंत नळाने पुरेसा व शुध्द पाणीपुरवठा करण्याचा उद्देश या मिशनचा आहे. नळाने तर दूरच पण, सार्वजनिक ठिकाणीही पाणी उपलब्ध होत नाही. मार्च 2024 पर्यंत कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.nnपाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकून झाली. काही ठिकाणी घरोघर दारात नळ जोडणी झाली. मात्र उदभव विहिरीनांच पाणी नाही. या विहिरी अक्षरश: कोरड्याठाक पडळ्या आहेत.कुठे वीज जोडणी तर कुठे विजेचे खांब लावणे बाकी आहेत. काही गावांमध्ये तर ठेकेदाराने अजून कामच सुरू केले नसल्याचे समोर आले आहे. ज्या विहीरी खोदून कोरड्याठाक पडल्या, त्याठिकाणी जागा बदलून विहिर खोदली जाणार आहे. त्यामुळे खर्चही वाढणार आहे. ठेकेदारांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.nnएका ठेकेदाराला सहा ते सात कामे देण्यात आली आहेत. त्यापैकी एकही पूर्ण करता आले नाही. यात नेमके कोणी आणि कोणाचे हित साधले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.n85 कामांपैकी 77 कामांची काम पुर्ण करण्याची मुदत संपली. 8 कामे जूनपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. वेळेत ही कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे.11 कामांमध्ये अनेक त्रुटी असून पुन्हा सुधारीत अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी वापरण्यात आलेले पाईप निकृष्ट दर्जाचे आहेत.nnदहा काम पूर्ण होवुन नळाने पाणी पुरवठा सुरू केला असल्याचा दावा ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाने केला.प्रत्यक्षात मात्र कुठे विहिरीचा उपसा बाकी तर काहीचे वीज जोडणी नाही. काही ठिकाणी पंप पाणी कमी फेकते ,अशा अनेक कारणांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्यास अडचणी येत आहेत.nnजलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामे ठेकेदारांनी मुदत संपूनही पूर्ण केले नाही. त्यामुळे गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.येत्या आठ दिवसांत संबधित गावांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू केला नाही तर प्रति दिवसाला दहा हजार रूपये दंड वसूल करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे.,,nअभियंता विशाल कांबळेnग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता पेठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *