नाशिक – रिलेक्सो डोमेसवेअर कंपनी प्रायोजित “”परिक्षेची पूर्वतयारी कशी करावी ?” या विषयांवर नाशिकमधिल इयत्ता १०, ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह येथे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये नँशनल मोटिव्हेशनल ट्रेनर, किरण मोहिते यांनी परिक्षेची पूर्वतयारी निर्भयपणे करून उरलेल्या वेळात ताणतणाव न घेता कसा अभ्यास करावा व कसे चांगले मार्क मिळवावेत,यावर सखोल मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनाने विद्यार्थी अक्षरश: भारावून गेले,आई-वडिलांच्या कष्टावर बोलत असतांना विद्यार्थी भावूक होऊन रडत होते.मोबाईल पासून कसे सावध रहावे,वेळेचे नियोजन कसे करावे, परिक्षेच्या अगोदर,परिक्षेच्या दिवशी व पुढील पेपरचा कसा अभ्यास करावा, परिक्षा स्थळावर काय काळजी घ्यावी,अवघड विषयांचे पेपर सोडवितांनाकाय काळजी घ्यावी,मनाची एकाग्रता कशी साधावी इत्यादी विषयांवर महत्वपूर्ण माहिती विविध फिल्मसच्या माध्यमातून त्यांनी मांडली.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करून करण्यात आली, ज्यामध्ये कुमारी गजाला व तन्जिला खान यांनी वाचन केले.रिलेक्सो कंपनीचे सिईओ आणि फाऊंडर मा.अबदुल्लाह खान सर यांनी कंपनी उभी करतांनाचा संपूर्ण संघर्ष विद्यार्थ्यांच्या समोर मांडला,व नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आपले व नाशिक शहराचे व देशाचे नांव उज्वल करावे, या हेतूने आम्ही आपल्या सोबत आहोत.यासाठी गरजू व मेहनती विद्यार्थ्यांना रिलेक्सो डोमेसवेअर कंपनी सदैव मदतीचा हात देण्यासाठी तयार आहे,अशी भावना व्यक्त केली.
याच कार्यक्रमात अमरावतीच्या झोपडपट्टी ते बॉलीवूड पर्यंत आपल्या रँपसॉंगच्या माध्यमातून एक नविन चेहरा लोकांसमोर येत आहे,त्या विपिन तातड यानेही विद्यार्थ्यांना आपली संघर्षमय कहानी सांगितली व सामाजिक विविध विषयांवर प्रकाश टाकणारी जबरदस्त काही निवडक गाणी सादर केली,विद्यार्थी प्रचंड भारावून ही गाणी ऐकत होती.तसेच कुमारी श्रावस्ती मोहिते हिनेही आपल्या वेगळ्या धाटणीतल्या सामाजिक गितांचा अविष्कार विद्यार्थ्यांसमोर ठेवून चांगलीच दाद मिळवली.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रिलेक्सो डोमेसवेअर कंपनीच्या एचआर मा.शितल मानवर व भारतीय हितरक्षक सभेचे सभानायक कृष्णा शिंदे यांनी खूपच सुंदर व विश्लेषणात्मक केले.उपस्थित विद्यार्थ्यांना रिलेक्सो डोमेसवेअर कंपनीच्या वतीने लकी ड्रा व्दारे बक्षिसे देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्तांगण इन्स्टिट्युट, एम्स चँरिटेबल ट्रस्ट, नाशिक, भारतीय हितरक्षक सभा,भारत यांनी विशेष सहकार्य केले, तसेच मा.अजमल खान, मा.कृष्णा शिंदे,मा.मौलाना सलिम खान, मा.सचिन जाधव,मा.आफताब खान,मा.रविंद्र गायकवाड,मा.शरद गोरे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मां अजमल खान यांनी केले,राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(महत्वपूर्ण विनंती – ज्या संस्था, संघटना,शाळा,कॉलेज,कोचिंग क्लासेस यांना हा उपक्रम आपल्या विद्यार्थांसाठी राबवायचा असेल,त्यांनी विद्यार्थांना अत्यंत उपयुक्त अशा या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि संपर्क करावा. नँशनल मोटिव्हेशनल ट्रेनर – किरण मोहिते मोबाईल -९५६१८८३५४९)
“आप उनसे भी ज्यादा सफल हो – ऐसा सोचनेवाले दुनियामें सिर्फ दो लोग है…आपके मॉं-बाप..सिर्फ उनके खातीर सफल हो के बताईऐ” – नँशनल मोटिव्हेशनल ट्रेनर -किरण मोहिते.
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!