प्रभाग क्रमांक 23 विनय नगर बस स्टॉप नाशिक येथे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ स्वागता रमेश उपसणी यांच्या वतीने युवा संघर्ष प्रतिष्ठान संचलित आरोग्य सेवा केंद्र हे परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले, यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांच्या शुभहस्ते फीत कापून आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची सुविधे सह, अत्यंत अल्प दरात रक्त लघवी तपासणी, एक्स-रे इत्यादी सुविधांनसह, शासनाच्या मार्गदर्शन आरोग्य विषयक योजनांची माहिती या आरोग्य केंद्रात मिळणार असून, परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी सुजाताई डेरे माजी नगरसेविका, राकेश परदेशी प्रदेश सचिव सहकार सेना, वैशालीताई पोतदार, अक्षदा ताई घोडके, ज्योती शिंदे, प्रमोदजी साखरे, हितेश गुरव, रागिनी कोदे, जावेद शेख, अक्षय खंडारे,यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तसेच, युवा संघर्ष प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
प्रभाग क्रमांक 23 च्या नागरिकांसाठी आरोग्य सेवा केंद्र सुरू
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!