भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक च्या टीमने छापा मारून कारवाई केली आहे. नाशिक शहरातल्या पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अवैद्य धंद्यांवर गुन्हे शाखेच्या कारवाया का होत आहेत हे अवैद्य धंदे स्थानिक पोलीस स्टेशनला माहीत नाहीत का ? क्राइम ब्रांच चे खबरे आहेत तसे खबरे स्थानिक पोलीस स्टेशनचे नाहीत का असे एक ना अनेक प्रश्न आता उद्भवला लागले आहेत कारण पोलीस कारवाया जोमाने सुरू झाले आहेत भद्रकाली पोलीस स्टेशन अंतर्गत चालणाऱ्या जुगार मटक्यावर कारवाई करण्यात गुन्हे शाखा युनिट वनच्या पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक विजय धुमाळ यांना मिळालेल्या गुप्त खोबऱ्याच्या बातमीनुसार भद्रकाली परिसरातील बागवानपुरा शिरसाट हॉटेल समोर सारा मेडिकलच्या बाजूच्या बोळीत असलेल्या एका घरामध्ये संसहित मुसा सय्यद जुगार मटक्यावर पैसे लावून जुगार खेळत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय विजय ढमाळ किशोर खांडवी व अन्य पोलिसांना सोबत घेऊन एका घरामध्ये पाच इसम कल्याण मेन बाजार महाराष्ट्र बाजार नावाच्या सत्या आकड्यांवर जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यांनी या अवैध धंद्यावर छापा मारून कारवाई केली यात संशयित आरोपी नुसार सय्यद वय वर्ष 21 राहणार गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक रोड आणि निसार मणियार वय वर्ष 52 राहणार काजीपुरा विठ्ठल मंदिराजवळ भद्रकाली इजाज अयुब शेख वय वर्ष 44 राहणार मुलतानपुरा उर्दू शाळेच्या पाठीमागे भद्रकाली नाशिक मुजफ्फर अश्रफ खान वय वर्ष 50 राहणार काजीपुरा विठ्ठल मंदिराजवळ भद्रकाली नाशिक सचिन रामदास भोईर वय वर्ष 34 राहणार औरंगाबाद रोड निलगिरी बाग पंचवटी यांना जुगार मटका खेळताना मिनिट क्रमांक एकच्या पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून नऊ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जुगार मटक्याचा मालक संशयित आरोपी आरिफ बालम सय्यद याचा हा जुगार मटका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम चार-पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस उपायुक्त किशोर खांडवी मनोज डोंगरे वसंत पटाईत रामदास भडांगे अण्णासाहेब गुंजाळ तसेच भद्रकाली पोलीस स्टेशन कडील रमेश कोळी लक्ष्मण ढेपले यांनी संयुक्त कारवाई केले.