गावठी कट्टा बाळगणारा अटक मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी
नाशिक : प्रतिनिधीnमध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयितास ताब्यात घेत त्यांच्याकडून 35 हजार रुपयांचा एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्तोल) व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आला.nपोलीस हवालदार शेरखान पठाण, पोलिस नाईक प्रजित ठाकुर यांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित समीर सागर पानसरे ( रा देवळाली गाव, नाशिक, हा नाशिक औरंगाबाद रोडवर, नांदुर नाका) यास ताब्यात घेत त्यांच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा ताब्यात घेतली. संशयिता विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 मपोका कलम 135 प्रमाणे कार्यवाही करिता आडगाव पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले . सदरची कामगिरीnपोलिस निरीक्षक डॉ अंचल मुदगल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी , हवालदार शेरखान पठाण, किशोर देसले,समीर चंद्रमोरे, पो ना संदीप पवार, अमलदार प्रजीत ठाकुर यांचे पथकाने केली .
