सतीश रुपवते संपादक नाशिक
नाशिक पोलीस आयुक्तालयातून 25 पोलीस कर्मचारी पी.एस.ओ ट्रेनिंगसाठी धुळे येथे पाठवण्यात आलेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची मर्जी नसतानाही या पोलिसांना पोलीस ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले आहे. मात्र ज्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी पोलिसांना खाण्याची व्यवस्था केलेली नाही. सदरचे ट्रेनिंग बारा दिवस चालणार आहे. आज म्हणजे 22 जानेवारी 2023 रोजी नाशिक मधील 25 पोलीस कर्मचारी धुळे येथे पोहोचले आहेत. अद्याप या पोलिसांना शासनाचा भत्ता मिळालेला नाही. स्वखर्चाने हे पोलीस आपला स्वतःचा खर्च करीत आहेत काही पोलीस कर्मचाऱ्यांकडे पैशाची चणचण असल्यामुळे त्यांचे खाणे पिण्याचे अत्यंत हाल होत आहेत. एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी बोलणे झाले उद्या तुमचा पत्ता तुम्हाला च्या खात्यात येऊन जाईल न आल्यास तुम्ही स्वखर्चाने ट्रेनिंग कॅम्प करावा. तुमच्याकडे पैसे नसतील तर मरून घ्या. असा बेताल सल्ला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याला दिला आहे यामुळे पोलिसांमध्ये संताप जनक वातावरण निर्माण झाले आहे. पत्ता मिळाला नाही तर बारा दिवस करायचे काय असा पोलीस कर्मचाऱ्यांसमोर आता प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या भत्त्याची दखल प्रशासन घेईल का असाही प्रश्न आता उद्भभऊ लागला आहे.
धुळ्याच्या पी.एस.ओ ट्रेनिंग सेंटर मध्ये नाशिक पोलिसांचे प्रचंड हाल.
Recent Comments
on Hello world!