असंख्य पदाधिकारी पुन्हा स्वगृही *संजय राऊत यांनी केले स्वागत व बांधले
नाशिक-शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गद्दारांच्या (शिंदेसेना) कळपात गेलेले विनोद नुनसे व नाशकातील अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतले.आता अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू,असे अभिवचन नूनसेसह सर्वांनी दिले. या सर्वांना शिवसेनेची बुलंद तोफ संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आलेnखोटी आश्वासने देऊन तसेच दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेण्यात आले होते.परंतु काही दिवसातच आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे आणि आपण चुकीच्या लोकांच्या कळपात दाखल झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्हाला खूपच दुःख झाले आणि आम्ही पुन्हा उद्धव साहेबांच्या पक्षात परतण्याचा निर्णय घेतला असे स्वगृही परतलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.nस्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे,स्वप्निल गायकवाड,पवन संसारे,समीर कांबळे,प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे,दादू खंडारे,सार्थक तालखेडकर,प्रवीण पवार,किशोर आहेर,अभिलाष चव्हाण,राहुल पिंगळे,चेतन पानसरे,चेतन गायकवाड,सचिन धनेधर,गणेश वाबळे,निखिल पाटील,रोहित बाविस्कर,भवन जाधव,राहुल येवले, मनोज राजपूत,दिनेश शिंदे,भावेश पगार यांचा समावेश आहे.nयावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,नितीन आहेर,कुणाल दराडे,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित,माजी महापौर विनायक पांडे,शोभा मगर,शोभा गटकळ,मंगला भास्कर,विलास शिंदे, सचिन मराठे,महेश बडवे,राहुल दराडे, वीरेंद्र टिळे,राजेंद्र क्षीरसागर आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
