August 8, 2026

वीर जवान अजित शेळके यांच्यावर अंत्यसंस्कार

0

 वीर जवान अजित शेळके यांच्यावर मानोरी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.   राजस्थान येथे सैन्यात कार्यरत  असलेले  जवान अजित शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला होता . सकाळी ९ सोमवारी (दि 20) आज येवला तालुक्यातील मानोरी येथे त्यांच्या गावी शहीद वीर जवान यांच्या पार्थिवावर शोकाकुळ वातावरणात  शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.   वीर जवान अजित शेळके अमर रहे अशी घोषणा देण्यात आली. शेळके परिवाराच्या वतीने वीर जवान अजित शेळके यांच्या पार्थिवावर फुले वाहण्यात आली परिवारातील पत्नी, आई, वडील, भाऊ, तसेच नातेवाईकांनी आपला शोक व्यक्त करून जवान अजित शेळके यांनी अभिवादन केले.  तहसीलदार प्रमोद हिले,  अरमाड बटालियनच्या वतीने वीर जवान शेळके यांच्या पार्थिवावर आदरांजली वाहण्यात आली.    शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले०. या प्रसंगी शिवसेनेचे  संभाजी पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर , पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, बाळासाहेब लोखंडे, आदीसह परिसरातील  नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *