August 7, 2026

नराधम आईनेच केली चिमुकलीची हत्या

0

 nn nnनाशिक : गंगापूरnnतीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून नराधम आईनेच हत्या केल्याची घटना गंगापूर पोलीसांनी उघडकीस आणली आहे. गंगापूर पोलीस ठाण्या़च्या हद्दीत धृवनगर परिसरात सोमवारी (दि २०)nधृवांश भूषण रोकडे वय ३ महिने, असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. गंगापूर सातपूर लिंक रोड येथील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे पत्नी, आई व ३ महिन्याची चिमुकली धृवांशी यांच्यासमवेत राहतात. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर म्हणुन कामाला आहेत.nnघरात त्यांच्या आई व पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी त्यांची आई दूध आणण्यासाठी घराबाहेर गेल्या असता . एका अज्ञात महिलेने अचानक घरात घुसत धृवांशी च्या आईच्या नाकाला रूमाल लावत बेशुद्ध करत महिलेने पलंगावर झोपलेल्या तीन महिल्याच्या निरागस धृवांशीचा धारधार शस्त्राने गळा चिरला असल्याची तक्रार  आईने दिली होती . गंगापूर पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास केला असता. सदर मुलीची हत्या तिच्या आई युक्ता भुषण रोकडे (वय २४ रा. शिवशक्ती कॉलनी धुर्वे नगर) हीने केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली. पती व सासु हेच मुलीवर जास्त प्रेम करत होते. मुलगी ही त्यांच्या सोबत आनंदी राहत असल्याने नैराश्याच्या कारणातुन मुलीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे.nगंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करण्यात येत आहेत.n.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *