HomeCrimeसोमनाथला सातपूर पोलिसांनी शोधलेच जालन्यात सापडला सोमनाथ.

सोमनाथला सातपूर पोलिसांनी शोधलेच जालन्यात सापडला सोमनाथ.

सातपूर, ता. ७: ऑनलाइन रॉलेट गेमच्या नादी लागून घरातील बांधकामासाठी जमवलेली रक्कम घेऊन घरातून पळून गेलेला त्या युवकाचा शोध घेण्यात अखेर सातपूर पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी त्या युवकाचे ब्रेन वॉश करत त्याला पालकांच्या स्वाधीन केले.
श्रमिकनगर भागातील गुंठेवारी येथे सोमनाथ महादू सरोदे हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कुटुंबासोबत राहतो. सोमनाथचे वडील बिगारी काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमनाथ ऑनलाइन रोलेट गेमच्या नादाला लागला आणि त्यात लाखो रुपये हरला. त्यामुळे सोमनाथ नैराश्यात गेला होता. सोमनाथच्या वडिलांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी केले.
कसेबसे सुमारे ७ लाख रुपयांची जमवाजमव केली होती. मात्र, रॉलेटच्या आहारी गेलेल्या सोमनाथने ते पैसे घेत घरातून पळ काढला. ही बाब कुटुंबीयांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून सोमनाथची शोधाशोध केली.
अखेर सातपूर पोलिस ठाण्यात २१ जानेवारीला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी रॉलेट चालवणाऱ्या निखिल पाटील याच्यावर कारवाई करत सोमनाथचा शोध सुरू केला. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे गतिमान करत सोमवारी ६ तारखेला सोमनाथला जालन्यातून ताब्यात घेतले.सोमनाथचे मतपरिवर्तन करत वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सरोदे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!