HomeCrimeऑनलाइन जुगारीने संभाजी राजांच्या मित्रालाही सोडले नाही.

ऑनलाइन जुगारीने संभाजी राजांच्या मित्रालाही सोडले नाही.

ऑनलाइन गेम रोलेट बिंगो सारख्या खेळांमध्ये शेकडो युवक जुगारीशी व्यसन जोडल्याने कर्जबाजारी झाले आहेत.12 फेब्रुवारी रोजी संभाजी राजांचा वाढदिवस होता.यावेळी महाराष्ट्राची दशा आणि दिशा हा परिसंवाद झाला. अनेक मान्यवरांनी समुपदेशन केले. यावेळी मानसोपचार तज्ञ व समुपदेशक शैलेंद्र गायकवाड यांनी ऑनलाईन जोडीचा विषय हा गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे. या खेळामुळे अनेक युवक युवती कर्जबाजारी झाल्या आहेत आत्महत्या होतात त्यामुळे याबाबत सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे अशी सूचना केली. या गेममुळे खेळणाऱ्यांमध्ये पॅथॉलॉजिकल ग्लोबिन डिसऑर्डर निर्माण झाले आहे. सतत मोठी रक्कम जिंकणे अशा प्रकारचे व्यसन युवकांमध्ये निर्माण झाले आहे बिंगो म्हणजे बिगविन टेम्पटेषण तयार युवकांमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. उपस्थितांमध्ये हीच चर्चा सुरू होती. छत्रपती संभाजी राजे देखील अस्वस्थ झाले होते. संभाजी राजे म्हणाले माझ्याबरोबर शिक्षण घेतलेल्या एक जवळच्या व्यक्तीलाही त्याची झळ बसली आहे तो विज्ञान क्षेत्रात काम करीत होता त्याने आयुष्यात कमावलेले सर्व कोटी दोन कोटीची बचत या गेममध्ये गमावली. त्याला विचारल्यावर त्यांनी सांगितले त्याच्या कन्येचा विवाह करायचा होता त्यासाठी पैसे हवे होते म्हणून तो या मोहात पडल्याचे सांगितले. ऑनलाइन पासून युवक युवतींनी दूर राहिले पाहिजे अशा प्रकारचे गेम्स मोबाईलवर असल्यामुळे कोण काय करता हे लक्षात येत नाही त्यामुळे ज्याला ज्याला शक्य होईल त्याने याबाबत प्रबोधन करावे असे संभाजी राजे यांनी सांगितले आहे.संभाजीराजे म्हणतात, ऑनलाईन गेम्सपासून युवा पिढीला वाचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची.ऑनलाईन गेम्सचे अनेक अॅप आणि सॉफ्टवेअर सध्या सहज मोबाईलवर उपलब्ध होतात. विविध अभिनेते देखील त्याच्या जाहीराती करतात. त्यामुळे तरूण वर्ग त्याकडे आकर्षित होते. त्याच्या जोडीला गेम्स खेळण्यासाठी ऑनलाईन पैशांचे आमिष देखील असते. त्यामुळे एक मोठा वर्ग ऑनलाईन गेम्सच्या मोहात अडकला आहे. यावर उपस्थितांतील अनेकांनी चिंता व्यक्त करीत हा सध्याचा गंभीर प्रश्न आहे. त्यानु समाजात विकृती व प्रश्न निर्माण होत असल्याने त्यात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली.यावेळी माजी महापौर प्रकाश मते,डॉ.अतुल वडगावकर,कल्याणी चॅरिटेबल ट्रस्टचे रवींद्र सपकाळ,मुरलीधर पाटील,उगले,पियुष सोमानी,शैलेंद्र गायकवाड,कुणाल पाटील,जयप्रकाश जातेगावकर यांसह विविध मान्यवरांनी सुचना केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!