August 7, 2026

२० हजारांची लाच घेणारा सहाय्यक अभियंता ताब्यात 

0

 nnअहमदनगर : जिल्हाnn nnवीज मीटर मध्ये  छेडछाड केल्याने मीटर तपासणी केल्यानंतर काढल्यानंतर पुन्हा मीटर जोडण्यासाठी लाच घेणार्‍या सहाय्यक अभियंता यास अटक करण्यात आली आहे.  तक्रारदार यांचे आष्टी जिल्हा बीड, येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे . सदर ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडीपाटील, यांच्याकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे . सदर कनेक्शनच्या मीटर मध्ये काहीतरी छेडछाड केल्याने मीटर तपासणी केल्यानंतर काढुन नेले. यानंतर सदर मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे वरिष्ठ उप अभियंता यांच्याकरिता 20 हजार रुपये मागणी केली. सहाय्यक अभियंता कमलेश युवराज पवार, (वय 29, सहायक अभियंता,वर्ग 2. म रा वि वि कंपनी मर्या, सब स्टेशन , चिचोंडीपाटील, ता अहमदनगर) यास लाच घेतांना अटक केली. अहमदनगर नगर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर, सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राधा खेमनार , चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांनी केली.nn️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *