August 6, 2026

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊरत्न पुरस्कार

0

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊरत्न पुरस्कार देण्याबरोबर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक गाडगे महाराज चौक, मेनरोड येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. त्याच बरोबर शिवजन्मोत्सव समितीचे विविध विभागातील अध्यक्ष यांचे सन्मान देखील या कार्यक्रमा प्रसंगी करण्यात आले. नाशिक ते सारंगखेडा हा २५० कि.मी.चा प्रवास कुमारी हृदया पृथ्वीराज अंडे, महिला पोलिस कर्मचारी विजया ठाकरे व यशोदा देशपांडे , इंटरनॅशनल कब्बडी कोण क्षिप्रा पैठणकर, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करणारे अनंत ठाकूर यांना जिजाऊरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवजन्मोत्सव समिती जूने नाशिकचे अध्यक्ष दिनेश चव्हाण पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मामा राजवाडे, नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा लवटे यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाही जिजाऊ जयंती निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने होत असते. जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते सिंदखेडराजा बुलढाणा येथे होणाऱ्या मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी जात असतात. जगातील सर्वात मोठी पुस्तकांची जत्रा या ठिकाणी भरत असते. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रमेश काका भोसले, निलेश काका कुसमोडे, जगदिश शेजवळ, अंकुश पवार, संदिप कानडे, दिपक दहीकर, विकी ढोले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ.स्वप्निल इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, विक्रम गायधनी, शरद लबडे, विलास वाघ, शाहीर संविधान गायकवाड, हरेश्वर पाटील, सागर पाटील, मंदार धिवरे, चेतन पगार तसेच संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *