August 8, 2026

शहरात काँम्बिंग आँपरेशन कारवाई

0

 nn nnnnनाशिक : शहरnnशहरातील वाढत्या गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठीnसोमवारी मध्यरात्री रात्री शहरातील सर्व पोलीस ठाणे हददीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोम्बींग ऑपरेशन राबवत कारवाई सराईत गुन्हेगारांवर केली. सातपुर गोळीबार प्रकरणातील ८ संशयितांवर थेट मोक्का लावण्याची कारवाई केली.nवरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षकसह शेकडो पोलीस सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.nयावेळी पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. आयुक्त वसंत मोरे यांच्यासह गुन्हेशाखा, युनिट १ व २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदार तसेच गुंडा पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, खंडणी पथक, शस्त्र व दरोडा विरोधी पथक या पथकातील अधिकारी व अंमलदार, ३ पोलीस उपआयुक्त, ५ सहा. पोलीस आयुक्त, १५ पोलीस निरीक्षक, २९ सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, २७० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी हिस्ट्रीशीटर यांच्या राहण्याच्या संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यात आली. संशयितांची पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी करण्यात आली.nआडगांव, म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, सरकारवाडा, गंगापुर, सातपुर, अंबड, इंदिरानगर, नाशिकरोड , उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस ठाणे हद्दीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या नेतृत्वात तर पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी फुलेनगर पंचवटी, निलगिरीबाग, नांदुरनाका, अश्वमेध नगर, बोरगड, म्हसरूळ, भिमवाडी, पंचशीलनगर, बजरंगवाडी, नागसेननगर, मल्हारखान, रविवार पेठ, संतकबीर नगर, आनंदवली, शिवाजी नगर परिसर तसेच पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखाली अंबड पोलीस ठाणे परिसर, प्रबुध्द नगर, संतोषीमाता नगर, श्रमीकनगर, म्हाडा वसाहत, राजीव नगर, पाथर्डीगाव, सिन्नर फाटा, जेलरोड, रेल्वे स्टेशन परिसर, नाशिकरोड, सुंदरनगर, गांधीनगर, नारायण बापु नगर, कॅथे कॉलनी, भगुर, संसरी गाव दे. कॅम्प परिसर या भागात कोम्बिंग करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *