उन्हाळयाच्या दिवसात अन्न व औषध प्रशासनाची शितपेयबाबत धडक मोहिम सुरु
nnसध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा चढत असुन जवळपास ते ४० डिग्रीच्या वर असल्याने शितपेय, फळे, आईसक्रिम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्स याची मोठयाप्रमाणे बाजारात विक्री होत असुन त्या संदर्भात त्याची गुणवत्तेच्या चावत अन्न व औषध प्रशासनाने ठोरा मोहिम हाती घेतलेली असुन त्याचा भाग म्हणून शरदचंद्र पवार मार्केट या ठिकाणी श्री शारदा फ्रुटस कंपनी, एपीएमसी मार्केट, पेठरोड, पंचवटी, नाशिक या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. राराकर यांनी तपासणी करुन विक्रीसाठी साठविलेल्या आंबा व आंबा पिकविण्यासाठी वापरण्या येणारे इथलीन रायपनर सॅचेटस चे नमुने घेण्यात आले. त्यानंतर ओझर येथे व्ही. ए. एन. सी. एजन्सी, ओझर, ता. निफाड, या ठिकाणी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. देवरे यांनी धाड टाकुन त्या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेले शितपेय १ थम्सअप, मँगो ड्रिंक्स माझा व स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेवुन स्टिंग एनर्जी ड्रिंक्सचे १६० वाटल्या किंमत रुपये १९२००/- इतका जप्त केला.nnत्यानंतर व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स, मालेगांव या ठिकाणी भेट देवुन फ्रोझन डेझर्ट याचा नमुना घेवून विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेला आहे. दिनांक २०.०४.२०२३ रोजी आकाश एजन्सी, गणेश कंपाऊंड, जऊळके, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. योगेश देशमुख व सहायक आयुक्त अन्न, श्री. विवेक पाटील यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहुन स्टिंग कॅफिनेटड विव्हरेज, थम्सअप चार्ज कॅफिनेटड विव्हरेज व मॉनस्टर कॅफिनेटेड विव्हरेज चे नमुने घेवुन त्यांचा साठा एकूण १३२०० /- इतका जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी घेतलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले असुन अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही घेण्यातnnयेईल. सदरची धडक मोहिम ही संपूर्ण उन्हाळाभर अशी सुरू राहील.. सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी, श्री. योगेश देशमुख, श्री. अमित रासकर, श्री. संदिप देवरे, वाहनचालक श्री. निवृत्ती साबळे व नमुना सहाय्यक श्री. विजय पगारे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न), श्री. विवेक पाटील, श्री. मनिष सानप, श्री. उदय लोहकरे व सहआयुक्त नाशिक विभाग, श्री. संजय नारागुडे यांचे मार्गदर्शनाखाली घेतली
